जागतिक बॅडमिंटन स्पर्धा – सिंधू खेळणार तिचा पहिला सामना

नानजिंग : भारताची स्टार बॅडमिंटनपटू ऑलंपिक रोप्यपदक विजेती पी.व्ही सिंधू ही आज जागतिक अंजिक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत आपला पहिला सामना खेळणार आहे. या स्पर्धेत नेहमीच सिंधूची कामगिरी चांगली झाली आहे. मागील वर्षी या स्पर्धेत तिला उपविजेतेपद आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तर त्याच्या अगोदर २०१३ आणि २०१४ मध्ये झालेल्या या स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवत तिसरे स्थान पटकावले होते.
आजचा तिचा सामना  १९ वर्षीय फित्रियानी फित्रीयानी हिच्याविरुद्ध मुख्य कोर्टावर होणार आहे.
याव्यतिरिक कोर्ट २ वर झालेल्या सामन्यात भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याने सामना जिंकत तिसर्या फेरीत प्रवेश केला. अन्य सामन्यात आज भारताचा समीर वर्मा पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या लिन डॅन विरुद्ध दोन हात करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)