‘राज ठाकरे-शरद पवार’ भेट; चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात

मुबंई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. कालच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर आज राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यात जाऊन शरद पवारांची भेट घेतली. यावेळी अजित पवारही उपस्थित होते. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी या भेटीनंतर राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधान आलं आहे.

शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात केवळ 15-20 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते आहे. पण भेटीत नेमकी काय चर्चा झाली , हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन, लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मोदी आणि शहा यांच्याविरोधात आपल्याला लढायचं आहे, अशी जाहीर भूमिका राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगून विधानसभेच्या तयारी लागा असं सांगितल होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)