वाद मिटवण्यासाठी आज किरीट सोमय्या मातोश्रीवर ? ; उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता

मुंबई: किरीट सोमय्या यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी न देण्यावरून शिवसेना कार्यकर्ते आक्रमक आहेत. दरम्यान, महायुतीत निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी आज किरीट सोमय्या मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

भाजपचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड सोमय्यंना घेऊन मातोश्रीवर दाखल होणार आहेत. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर आजच हा वाद मिटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. ‘ईशान्य मुंबईबाबत कोणीही परस्पर वादग्रस्त भूमिका जाहीरपणे मांडू नये. तर यापुढे फक्त नेमलेल्या प्रवक्त्यांनीच भूमिका मांडाव्यात,’ असे त्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)