नगर_महापालिका_रणसंग्रागम_2018 : मुख्यमंत्री फडणवीस यांची शुक्रवारी नगरला सभा

नगर – नगर महापालिका निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत भाजपने दिग्गज मंत्र्यांच्या प्रचार सभांचे नियोजन केले आहे. आता प्रचार संपण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असून भाजपच्या प्रचार मोहिमेची सांगता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने होणार आहे. येत्या 7 डिसेंबर (शुक्रवारी) रोजी दुपारी तीन वाजता गांधी मैदानात भाजपने विराट विजय संकल्प सभेचे आयोजन केले असून या सभेला मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत.

नगर महापालिकेसाठी येत्या 9 डिसेंबरला मतदान होणार असून आतापर्यंतच्या प्रचारात भाजपचे अनेक महत्वाचे नेते सहभागी झाले आहेत. येत्या 7 डिसेंबरला खुद्द मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याने भाजपच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. विजय संकल्प सभेत ते काय बोलतात याकडे नगरकरांचे तसेच विरोधकांचेही लक्ष लागून राहिले आहे.

-Ads-

आपल्या घणाघाती भाषणातून ते विरोधी पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाचा कसा समाचार घेतात. याबाबत नगरकरांमध्ये उत्सुकता असून मुख्यमंत्री नगरच्या सर्वांगीण विकासासाठीच्या एखाद्या योजनेचे संकेत देतात का, याबाबतही मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)