काँग्रेसनी पंतप्रधान मोदींना संबोधले शिशुपाल, प्रचारासाठी पुस्तकरूपी नवा फंडा

मुंबई – सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे आहे. मोदींचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधीपक्ष एकत्रित आले आहेत. भाजप पक्ष आणि नरेंद्र मोदी, अमित शहा हे दररोज रॅलीव्दारे काँग्रेसरवर निशाना साधत आहेत. काँग्रेस-भाजप यांच्याकडून सोशल माध्यमाव्दारे अनेक नवनविन फंडे वापरून आरोप-प्रत्योरोप करून आपल्या पक्षाचा प्रचार केला जात आहे. अशातच आज काँग्रेसने भाजपचे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी पुस्तररूपी एक नवीन फंडा समोर आणला आहे. नरेंद्र मोदी यांच्या गलथान कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तीकाचे प्रकाशन काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.

पुस्तकामध्ये कार्टूनच्या चित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गलथान कारभार म्हणजेच चुकीची कामे काँग्रेसने दाखवली आहेत . या पुस्तकामध्ये पहिली चुक ही राफेल करार, दुसरी चुक ही जीएसटी आणि तिसरी चुक ही नोटाबंदी दाखविण्यात आली आहे. अशाप्रकारे मोदी सरकारच्या चुकीच्या 100 गोष्टी या पुस्तकाव्दारे दाखविण्यात आल्या आहेत.

काँग्रेस हे पुस्तक संपूर्ण देशात घरा-घरात पोचविणार असून याव्दारे भारतातील जनतेला मोदी सरकार कसे अपयशी ठरले आहे, हे पटवून देणार आहे. पुस्तकात नोटाबंदी, जीएसटी आणि राफेल याशिवाय मोदी यांच्या सरकारच्या काळात झालेल्या शेतकरी आत्महत्या, वाढलेले बेरोजगारीचे प्रमाण आणि इतर आणखी मुद्दयाचा समावेश करण्यात आला आहे.

या पुस्तकाचं खास वैशिष्ट्ये म्हणजे या पुस्तकांच नाव महाभारतातील पात्र शिशुपालच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने हे पुस्तक आज महाराष्ट्रात लाॅन्च केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रकारे आपल्या प्रत्येक रॅलीत काँग्रेस आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाना साधत आहेत, त्यास प्रत्युत्तर म्हणजे हे पुस्तक होय असं समजल जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)