पदावर रूजू होताच ‘आलोक वर्मा’ यांची धडक कारवाई

पाच मोठ्या अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या

नवी दिल्ली – आलोक वर्मा यांनी सीबीआयच्या प्रमुखपदी रूजू होताच ताबडतोब निर्णय घेणे सुरू केले आहे. आलोक वर्मा यांनी गुरूवारी मोठे निर्णय़ घेत पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आलोक वर्मा यांनी अजय भटनागर, डीआईजी एमके सिन्हा, डीआईजी तरूण तरूण गौबा, जेडी मुरूगसन आणि एडी शर्मा यांची बदली केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याआधी बुधवारी कामावर रूजू होताच आलोक वर्मांनी मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी तत्कालीन निदेशक (प्रभारी) एम नागेश्वर यांच्याव्दारे अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत घेण्यात आलेले सगळे निर्णय रद्द केले होते.

दरम्यान,  सीबीआई डायरेक्टर आलोक वर्मा आणि स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांच्यामधील आरोप –प्रत्यारोप हे सार्वजनीक झाल्यानंतर त्या दोन्ही अधिकाऱ्यांना केंद्रा सरकारने सक्तीच्या सुट्टीवर पाठविले होते. याप्रकरणी वर्मानी याचिका दाखल केली होती. त्यानंतर मंगळवारी  केंद्र सरकारचा या आदेशाला सुप्रीम कोर्टाने रद्द केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)