सातारा पालिकेचा आज अर्थसंकल्प

सातारा  –सातारा नगरपरिषदेच्या छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) कला व सांस्कृतिक महोत्सवात मान्यवरांचा सत्कार झाला. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी ‘हमे तुमसे प्यार कितना ये, हम नहीं जानते….. हे गीत मार्गदर्शनाच्या वेळी म्हटले होते. आता त्यांची सत्ता असलेल्या सातारा नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात आज सोमवार दिनांक 18 फेब्रवारी रोजी सकाळी 11 वाजता सादर होणार आहे. त्यामुळे हमे तुमसे प्यार कितना दिसणार का? याची सातारकरांना उत्सुकता लागली आहे.

सन 2018 – 2019 आठमाही व्यवहारावरून व चौमाहीच्या संभाव्य जमा व खर्च यांचा विचार करून 2019-20 चे अंदाजपत्रक मंजूर करणेबाबत स्थायी समिती सूचना व शिफारसींचा विचार करून निर्णय घेण्याबाबत शिवाजी सभागृहात
विशेष सभा बोलवण्यात आली आहे. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेला नगरविकास आघाडी, सातारा विकास आघाडी, भाजप या पक्षांचे नगरसेवक किती निधी आणतात याकडे लक्ष लागलेआहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही वर्षात नगर विकास आघाडीचे नेते आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे नेते खा. उदयनराजे भोसले यांच्या राजकीय शीतयुद्धामुळे नगरपरिषेदेच्या सभांमध्ये त्याच्यावर जास्त चर्चा होऊन काही नगरसेवकांची कामे केली जात नाहीत. अशी चर्चा केली जात होती. परंतु स्थायी समितीच्या सभेला नगरविकास आघाडी व सातारा विकास आघाडी व भाजपच्या काही नगरसेवकांनी कामे मॅनेज करून घेतल्याने ज्या नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील कामे सुचविलेली आहेत. त्यांची कामे घेतली नाहीत ते नगरसेवक मात्र या अर्थसंकल्पावर काय सूचना करतात. याची नागरिकांना उत्सुकता लागलेली आहे.

खा. उदयनराजे भोसले यांनी कालच हॉटेल राजतारा येथे झालेल्या सभेत नगरसेवकांची कामे होत नसतील तर राजीनामा द्या असे खडे बोल नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांना सुनावले होते. त्याचे पडसाद या सभेत उमटण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी संपर्क वाढवला असला तरी गेल्या वर्षभराच्या कामकाजाबाबत सातारकरांची नाराजी प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

या अर्थसंकल्पाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे परंतु कराची वसुली कमी व खर्च जास्त तसेच आस्थापनाचा वाढता खर्च 30 टक्केपेक्षा जास्त होत आहे. सातारचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी याबाबत नगरपरिषेदेला लेखी सूचना केलेली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन व इतर देयके तातडीने देण्यात यावीत असे पत्रात नमूद केलेले आहे. सातारा नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांना सभागृहात फारसा प्रभाव टाकता आले नाही.

घंटागाडी चालकांचे आंदोलन, कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्‍न पुकारलेला संप, पिण्याच्या पाण्यासाठी झालेले आंदोलन या सर्व गोष्टींकडे पाहता या अर्थसंकल्पामध्ये विकासात्मक गोष्टींवर भर देऊन त्यासाठी तरतूद होणे गरजेचे आहे. सातारा नगर परिषदही सत्कार, कला व महोत्सव स्पर्धा एवढ्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहे का? असा प्रश्‍न नगरसेवक उपस्थित करणार का? की सभागृहात अर्थसंकल्पावर तडजोड केली जाईल याकडेही सातारकरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)