आज दिवस आणि रात्र दोन्ही बारा तासांचे!

मानवाला सुरुवातीपासूनच खोगोलशास्त्रा बाबत मोठं कुतूहल आहे. मानवाच्या या जिज्ञासेपोटी त्याने खगोलशास्त्रामध्ये अतोनात प्रगती केली आहे. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, उत्तरायण, दक्षिणायन, कोणत्या वेळी दिवस मोठा कोणत्या वेळी रात्र मोठी अशा नानाविध बाबींचा मानवाने उलगडा केला आहे. अशाच तुमच्या माझ्यासारख्या जिज्ञासूंसाठी आजचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा आहे कारण आजचा दिवस आणि रात्र हे एक समान असणार आहेत.

आज 21 मार्च रोजी आपणा सर्वांना बरोबर बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र अनुभवायला मिळणार आहे. सूर्य 21 मार्च 22 मार्च आणि 23 मार्च या तीन दिवसांमध्ये खगोलीय विषुववृत्तावर असल्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी आणि बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र अनुभवण्यास मिळते. आजच्या दिवशी सूर्य बरोबर सकाळी सहा वाजता उगवतो आणि सायंकाळी सहा वाजता मावळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)