अकबर यांचे भवितव्य आज ठरणार?

नवी दिल्ली, दि.13 -लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांचे पद धोक्‍यात आले आहे. आता उद्या (रविवार) परदेशातून भारतात परतल्यानंतर त्यांचे भवितव्य भाजपकडून ठरवले जाण्याची शक्‍यता बळावली आहे.

मागील काही दिवसांपासून लैंगिक छळाशी संबंधित मी टू मोहिमेने जोर धरला आहे. त्या मोहिमेंतर्गत अकबर यांच्यावरही आरोप झाले. त्यामुळे मोदी सरकारबरोबरच भाजपची कोंडी झाली आहे. सरकारी दौऱ्यासाठी परदेशात असणाऱ्या अकबर यांनी अजूनपर्यंत त्यांच्यावरील आरोपांना उत्तर दिलेले नाही. अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते उद्या मायदेशी परततील.

-Ads-

त्यांच्याबाबत भाजपने अद्याप तरी मौन बाळगले आहे. मात्र, त्यांनी एकदा उत्तर दिल्यानंतर भाजपने आपली भूमिका जाहीर करण्याचे ठरवले असल्याचे समजते. दरम्यान, अकबर यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांच्या पदावर कायम राहण्याविषयी हमी देता येत नाही. त्याविषयीचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेतील, असे भाजपच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. अकबर यांच्याविषयी भाजपमध्ये दुसराही मतप्रवाह आहे. अकबर यांच्यावरील आरोप खूप काळापूर्वीचे आणि ते मंत्री बनण्याच्या आधीचे आहेत. याशिवाय, त्यांच्याविरोधात कुठल्या गुन्ह्याचीही नोंद नाही, असे पक्षातील काहींचे म्हणणे आहे. तूर्ततरी प्रथम अकबर यांनी आरोपांना उत्तर द्यावे, असे भाजपला वाटत असल्याचे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)