आज भाजप-शिवसेना युतीची घोषणा होणार: संजय राऊत

मुंबई: आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता शिवसेना-भाजप युतीचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज मुंबईत येणार असून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील आणि युतीची घोषणा करतील, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊत म्हणाले, अमित शाह आज संध्याकाळी ‘मातोश्री’वर येणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. यानंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. मग दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल. युतीचे जे काही फॉर्म्युले आहेत, त्याबाबत सर्व दोन्ही प्रमुख नेते घोषणा करतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वीही युतीबाबत चर्चा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्रीवर गेले होते. मात्र आजचा भेटीनंतर शिवसेना – भाजपाकडून युतीची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)