शबरीमला मंदिराला तृप्ती देसाई भेट देणार 

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्र लिहून केली संरक्षण देण्याची मागणी 

तिरूअनंतपूरम  –
शबरीमला मंदिरात महिला प्रवेशाला विरोध होत असताना भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी शबरीमला मंदिराला दि. 17 रोजी, शनिवारी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्र लिहून त्यांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे. यावेळी तृप्ती देसाईसोबत त्यांच्या 6 सहकारीही उपस्थित असणार आहेत.

शबरीमला मंदिरात शनिवारपासून “मंडला मकरविल्लक्कु’ उत्सव सुरू होत आहे. यानिमित्त भगवान अयप्पा मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त तृप्ती देसाई यांनी शबरीमला मंदिराला भेट देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शबरीमला मंदिरात दर्शन घेण्यासाठी महिलांना प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

-Ads-

या प्रकरणी एक पुनर्विचार याचिकाही न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हे मंदिर 5 नोव्हेंबरला उघडण्यात आले होते. त्यानंतर 6 नोव्हेंबरला या ठिकाणी हिंसाचार घडला होता. ज्या महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यांना विरोध दर्शवित त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)