सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे ट्विटर हॅण्डल

सायबर गुन्ह्यासंदर्भात करणार जनजागृती

मुंबई – सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हॅण्डल सुरू केले आहे. या हॅण्डलद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची सर्वसाधारण माहिती तसेच यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात असून नागरिकांनी या ट्विटर हॅण्डलवरून माहिती घेण्याचे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे.

आधुनिक तंत्रज्ञान वाढत असतानाच देशात सायबर गुन्हेही वाढत आहेत. लोकांमध्ये या विषयी माहिती नसल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे होत आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने पावले उचलली आहेत. त्याचबरोबर लोकांमध्ये जागृती होणेही महत्त्वाचे आहे.

बॅंकेचा युजर आयडी, एटीएम/डेबीट कार्डचा क्रमांक व पीन, पासवर्ड, ओटीपी कोणाही व्यक्तिला देऊ नये, असे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे. तसेच सायबर गुन्हे कसे घडतात, त्यांची कार्यपद्धती कशी आहे. त्यापासून वाचण्यासाठी काय करावे, याबद्दलची माहिती देण्यासाठी गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हॅण्डल सुरू केले आहे. या ट्विटर हॅण्डलवरून नागरिकांना आवश्‍यक ती माहिती मिळणार असून त्यातून नागरिकांच्या माहितीत भर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमितपणे या ट्विटर हॅण्डलला भेट द्यावी व त्याला फॉलो करावे, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)