शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी “बालरक्षक”

पुणे – शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी “बालरक्षक’ ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. या ऍपचे उद्‌घाटनही नुकतेच करण्यात आलेले आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच शाळेत सतत गैरहजर असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी “बालरक्षक’ ऍपची निर्मिती करण्यात आलेली आहे.

प्राथमिक व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, पुणे महापालिकेचा शिक्षण विभाग यांच्या वतीने हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात बहुसंख्य शाळाबाह्य मुले आहेत. सहा ते चौदा या वयोगटातील ही मुले आहेत. या मुलांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक शाळेतून एका शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. कधीही शाळेत दाखल न झालेली मुले, तीस दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी गैरहजर असलेल्या मुलांचा शोध घेणे आदी कामे या शिक्षकामार्फत करण्यात येत आहे. ही सर्व माहिती ऍपवर संकलित करण्यात येणार असून या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)