नातं टिकवा असं…

प्रत्येकानं आपल्या नात्यामधले झालेले वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा; पण मनाविरुद्ध, इच्छा नसताना वाद मिटवले, तर ओझं म्हणून आणि नाईलाज म्हणून ते नातं टिकवू नये. पराकोटीचे वाद झाले असल्यास असं वाटणं स्वाभाविक आहे. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून किंवा दुसरे काय बोलतील या दबावाखाली कुठलेही निर्णय घेऊन नातं जोडू नका किंवा ते ताणूही नका. तसं केलं, तर तात्पुरतं सगळं ठीक होईल; पण नंतर त्या नात्यामध्ये खूप तणाव निर्माण होऊ शकतो. परिणामी, ते नातं जास्त दिवस टिकू शकणार नाही.

आधी राग शांत होऊ द्या : सगळं वातावरण थंड झाल्यानंतर वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. वाद झाल्यानंतर ते मिटवण्याची लगेचच घाई करू नका. वाद झाल्यावर प्रत्येकजण लगेचच शांत होईल असं नाही. समोरच्या व्यक्तीला शांत होण्यासाठी थोडा वेळ द्या. राग शांत झाल्यावर वाट मिटवले, तर ते नात्याच्या भविष्यासाठी योग्य असतं.

-Ads-

वाद होणारे विषय टाळा : ज्यामुळे वाद होतात ते विषय काढू नका. असा केल्यानं वाद मिटण्याऐवजी वाढतीलच. ते विषय न काढता त्यावर आपण कशी मात करू शकतो हा विचार करा आणि त्याप्रमाणे समंजसपणे वाद मिटवा. खूप लोक तेच विषय घेऊन त्यावर वाद घालत बसतात. मात्र, तसं न करता शांत डोक्‍यानं समजूतीनं बोलून वाद मिटवावेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)