बचत करण्यासाठी स्टेट बॅंक परदेशातील शाखा कमी करणार 

नवी दिल्ली: भारतीय स्टेट बॅंकेने परदेशातील 9 शाखा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खर्च कमी करण्यासाठी बॅंकेने यापूर्वीच आपल्या सहा शाखा बंद केल्या आहेत.
एकाच देशात दोन ते तीन शाखा असल्यास त्यांचे विलीनीकरण एकाच शाखेमध्ये करण्यात येईल. एसबीआयच्या 36 देशांत 190 शाखा असल्याचे समजते.
परदेशातील खर्च कमी करण्यासाठी गेल्या दोन वर्षात सहा शाखा अगोदरच बंद करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त अजून 9 शाखा बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रिटेल आणि डिजिटल बॅंकिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक परवीन कुमार गुप्ता यांनी सांगितले.
बॅंकेकडील भांडवलाचा योग्य वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व परदेशातील शाखा पूर्णक्षमतेने काम करत नाहीत. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये लहान शाखा असून त्यांचा पूर्ण वापर करणे आवश्‍यक आहे. नोव्हेंबर महिन्यात सरकारी बॅंकांच्या एकूण 216 विदेशी शाखांच्या व्यवस्थापनाची पाहणी करण्यास सांगण्यात आले होते. मार्च अखेरपर्यंत सरकारी बॅंकांच्या विदेशातील 35 शाखा बंद करण्यात आलेल्या आहेत. बॅंक नवीन शाखा उघडण्याचे प्रमाणही आगामी काळात कमी करण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)