गिरणी कामगारांना घरकूल योजनेतून घरे देणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई: मुंबईत आपल्याला हक्काची घरे मिळावीत यासाठी गेल्या आठवड्यात गिरणी कामगारांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मोर्चा काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकारात्मक पवित्रा घेतला आहे. गिरणी कामगारांना कालबद्ध कार्यक्रमाद्वारे शासनाच्या विविध घरकूल योजनेतून घरे देणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.

गेल्या आठवड्यात गिरणी कामगारांनी काढलेल्या मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलवाले होते. त्यानुसार सह्याद्री अथितीगृह येथे गिरणी कामगार कृती संघटनेच्या शिष्टमंडळाने गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुंबईतील गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न गेले काही वर्ष प्रलंबित असला तरी सर्व गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आमदार आशिष शेलार, गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मिलींद म्हैसकर व गिरणी कामगार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत तयार होणाछया घरांमधील काही घरे गिरणी कामगारांना देणार आहे. ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका हद्दीतील एमएमआरडीएची घरे गिरणी कामगारांना देण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. म्हाडामधून ही लॉटरी पद्धतीने गिरणी कामगारांना घरे देणार. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे शासनाच्या तयार असलेल्या घरामधूनही काही घरे गिरणी कामगारांना देण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत. गिरणी कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महसूल व कामगार विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या विविध घरकूल योजनांमधूनही कालबद्ध कार्यक्रमातून गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)