हृदयविकार टाळण्यासाठी करा व्यायाम…  

– डॉ. संतोष ढगे 
 
आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जगात, तणाव प्रचंड वाढल्याने रक्‍तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, शारीरिक निष्क्रियता याचेही प्रमाण वाढत जाते. या तणावाला बळी पडण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी, दररोज कमीतकमी तीस मिनिटे तरी ध्यान आणि व्यायामासाठी दिल्याने हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते. 
 
भारतीयांमध्ये उद्‌भवणारा हृदयविकाराचा झटका हा 50% लोकांना पन्नाशीच्या आतील लोकांमध्ये होतो आणि एकूण हृदयविकाराच्या धक्‍क्‍यांपैकी 25 टक्के हे 40 हून कमी वय असलेल्या लोकांना होतात. खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत शहरांमधील लोकांना हृदयविकार होण्याची शक्‍यता तिप्पटीने जास्त असते.
 
हृदयविकार हा प्रचंड ताणतणाव, खाण्याच्या अनियमित व वाईट सवयी, जंक फुड, मद्य आणि धूम्रपान यांमुळे होतो. तणावपूर्ण जीवनशैली आणि कामाचे वाढलेले तास यामुळे खाण्याच्या सवयी अनियमित झाल्या आहेत. लोकांच्या खाण्याच्या वेळाही नियमित नसतात. परिणामी, शरीराला आवश्‍यक असे पोषण मिळत नाही. उलट हानिकारक चरबी आणि विषारी पदार्थ भरले जातात. 
 
त्यामुळे लठ्ठपणा येतो, भारतातील लठ्ठ व्यक्तींची संख्या 2010 मधील 17.3 टक्‍क्‍यांवरून वाढून 2014 मध्ये 19.5 टक्‍के झाली आहे. मद्याच्या नियमित सेवनामुळे हृदयाचे ऱ्हिदम्स (ठोके?) अनियमित होतात ज्याला अऱ्हिदमिया म्हणतात. त्यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराईड्‌सचे प्रमाणही वाढू शकते. त्याचबरोबर वाढीव कॅलरी सेवनही, हे वेगळे सांगायलाच नको. 

धूम्रपानामुळे व्यायाम करण्याची क्षमता कमी होते आणि रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती वाढते. निरोगी आयुष्य जगण्यासाठी किंवा तणावाचा सामना करण्यासाठी तुम्हाला निकोटीन किंवा मद्य यांसारख्या हानिकारक कृत्रिम उत्तेजकांची गरज नाही. तुम्ही या गोष्टींची जागा पोषक अन्नाला देऊ शकता. यामुळे फक्त व्यायाम करण्याचीच क्षमता वाढते असे नाही तर तुमच्या आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक
मजबूत होता. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)