ग्लॅमरस दिसणे वाईट नाही – शार्मिन सहगल

“मलाल’मध्ये मीजान जाफरीसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री शार्मिन सहगल हिच्या परफॉर्मेंसची खूपच स्तुती करण्यात आली होती. शार्मिनने चित्रपटात येण्यापूर्वी आपले काका संजय लीला भंसाली यांना असिस्ट केले होते. तसेच ऑन-स्क्रीन चांगले दिसण्यासाठी आपले वजनही खूप कमी केले होते.

एका मुलाखतीत शार्मिन म्हणाली, सध्या मी ऑन-स्क्रीन न्यूड सीन देवू शकत नाही. एक अभिनेत्री म्हणून अजून मला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मी स्वतःला मर्यादित ठेवू इच्छित नाही. सेक्‍स सीन देण्यासाठी मला बॉडी कॉन्फिडेंस डिवेलप करायची आहे. मला असे वाटते की, तुम्ही मुलगा असो या मुलगी. तुम्हाला जर आत्मविश्‍वास नसेल तर तुमचा परफॉर्म उत्कृष्ट होवू शकत नाही.

शार्मिन म्हणते, चित्रपटात काम करण्यासाठी ग्लॅमरस दिसणे वाईट नाही. तसेच जेंडरच्या आधारावर मापदंड करणे चुकिचे असल्याचे तिचे मत आहे. असे काही घडल्यास मला वाईट वाटते, असे शार्मिनने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)