केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वांनाच केसीआर यांच्यापुढं झुकाव लागेल : राव 

हैदराबाद : तेलंगणा राष्ट्रीय समितीचे कार्यकारी अध्यक्ष के टी रामा राव यांनी आज आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसला बहुमत मिळणार नाही असे भाकीत केले. यावेळी बोलताना केंद्रामध्ये सत्ता स्थापन करायची असल्यास कोणत्याही पक्षाला केसीआर यांच्यासमोर झुकावेच लागेल असा दावा देखील राव यांनी केला.

“राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी टीआरएसला लोकसभेच्या जास्तीत जास्त जागांवर निवडून देणे गरजेचे असून जेव्हा आपला पक्ष सत्ता स्थापनेसाठी ‘निर्णायक’ भूमिका बजावणारा ठरेल तेव्हाच आपल्याला राज्यासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त सहकार्य मिळविणे शक्य होईल.” असे म्हणत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तेलंगणातील मतदारांना साद घातली.

“तुम्ही जर देशभरातील परिस्थिती पहिली तर लक्षात येईल की, भाजपचा आत्मविश्वास झपाट्याने कमी होत आहे, तर काँग्रेसला देखील देशभरातून जनमत मिळण्याबाबत विश्वास नसल्याने लोकसभेची प्रत्येक जागा सत्तास्थापनेसाठी निर्णायक ठरणार आहे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)