पुणे – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरू असून तिसऱ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. या महत्वाच्या दिवशी नेहा कालेलकर या तरुणी खास अमेरिकेतून मतदान करण्यासाठी पुण्यात आल्या आहेत. नेहा कालेलकर यांनी मतदान करत आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले.
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघातून 31 उमेदवार रिंगणात आहे. या उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) बंद होणार आहे.