घाबरलेले मोदी राफेल घोटाळ्यातून वाचण्यासाठी ‘मेघनाद’प्रमाणे जेटलींमागे लपत आहेत : तृणमूल काँग्रेस 

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी आज लोकसभेमध्ये राफेल कराराबाबत चर्चा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. लोकसभेमध्ये राफेल करारावर आपले मत मांडताना रॉय म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामायणातील मेघनाद या पात्राप्रमाणे असून ज्या प्रमाणे मेघनाद ढगांमागे लपत असे अगदी त्याच प्रमाणे ते अरुण जेटली यांच्या मागे लपत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये लोकसभेत उपस्थिती लावून राफेल बाबत चर्चा करण्याएव्हडे देखील धाडस नाही.”

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी देखील आज लोकसभेमध्ये राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच धारेवर धरले होते. राहुल यांनी ‘भित्रे मोदी हे राफेल बाबत चर्चा करण्याऐवजी घरात लपून बसत आहेत.’ अशी टीका केली होती.

यावर अरुण जेटली यांनी राहुल गांधींना तिखट प्रतिउत्तर देताना, ‘राहुल गांधी हे देशातील सर्वात मोठे खोटारडे असून खोटे बोलणे हा त्यांचा स्वभावच आहे.” असे वक्तव्य केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)