“तितली’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर थडकले 

झाडे आणि वीजेचे खांब कोसळले, रस्ते आणि रेल्वे वाहतुक विस्कळीत; जिवीत हानी नाही 
 
चक्रिवादळाची पूर्वसूचना मिळालेली असल्यामुळे सुमारे 3 लाख नागरिकांना बुधवारीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. राज्यभर 1.112 आश्रय छावण्यांमध्ये या नागरिकांनी तात्पुरता मुक्काम केला आहे. गंजम जिल्ह्यातील 105 आणि आंध्रातील विझियानगरममधील 18 गर्भवती स्त्रियांना जगतिसिंगपूरम येथे हलवण्यात आले आहे. वादळाच्या शक्‍यतेमुळे खुर्दा आणि विझियानगरमची रेल्वे वाहतुक बुधवारी रात्रीपासून बंद ठेवण्यात आली होती. रेल्वेमार्गांवर काही ठिकाणी झाडे आणि खांब पडल्यामुळे अडथळे आले आहेत. ते हटवण्याचे काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
भुवनेश्‍वर: “तितली’ हे चक्रिवादळ आज पहाटेच्या सुमारास ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागावर थडकले. यामुळे अनेक भागात वीजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडली. तसेच गंजम आणि गजपती जिल्ह्यात झोपड्यांचे आतोनात नुकसान झाले. मात्र या भागात कोणतीही जिवीत हानी झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आंध्रच्या श्रीकाकुलम जिल्हा, ओडिशाच्या गोपालपूर या भागांतही पहाटे 4.30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान “तितली’चा फटका बसला. वादळ किनाऱ्यावर आल्यानंतर तासभर ताशी 126 किलोमीटर वेगाने वारे वाहिले होते.
ओडिशातील गंजम, गजपती, खुर्दा, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रापारा, भद्रक आणि बालासोर या एकूण आठ जिल्ह्यांना “तितली’मुळे मोठे नुकसान झाले असल्याचे विशेष मदत आयुक्‍त बी.पी.सेठी यांनी सांगितले. चक्रिवादळामुळे या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागातील वीज आणि दूरध्वनी यंत्रणा कोलमडून पडली. मात्र मोठी वित्त अथवा जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. रस्त्यांवर झाडे आणि वीजेचे खांब पडल्यामुळे रस्ते वाहतुकीमध्ये अडथळे आले आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मदत आणि पुनर्वसनाची कामे वेगाने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच चक्रिवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत साहित्य उपलब्ध करून देण्याचीही सूचना दिली गेली आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)