शिर्डी: शिर्डी शहरात मंगळवारी झालेल्या गोळीबारातील एकाचा खून झाला या प्रकरणी पोलिसांकडून एक धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार टिक टॉकचा व्हिडीओ बनविण्याच्या नादात मित्रांकडून गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने त्याचे प्राण घेतले, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. शिर्डी शहरात गजबजलेल्या नालारोडलगत असलेल्या एका हॉटेलवर सायंकाळी फ्रेशअपसाठी रुम घेतला होता.
मंगळवारी सायं. 6 वाजेच्या सुमारास ही मुले टिकटॉकवर टाकण्यासाठी व्हिडिओ तयार करत होती. यात गावठी कट्टयाचा वापर करण्यात आला. आरोपी सनी पवार यांच्या हातातील कट्यातून गोळी सुटुन नात्याने चुलत दाजी असलेल्या सनी पोपट पवार (वय 20 रा.धुळदेव, ता. फलटन, जि. सातारा) यांच्याकडून शिर्डी लक्ष्मीनगर या भागात राहणाऱ्या प्रतिक उर्फ भैय्या संतोष वाडेकर (वय 19) या तरुणाचा जीव घेतला.
मयताच्या छातित गोळी घुसल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर चार जण पसार झाले. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी भेट दिली होती. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दोन जनांना ताब्यात घेतले. सनी पवार याने खुनाची कबुली दिली. त्याच्याकडे गावठी कट्टा व एक राऊंडदेखील जप्त करण्यात आला. गावठी कट्टयामुळे खून झाल्याची कबुली सनी पवार याने दिली.