टीपू सुलतान जंयतीवरून राजकारण पेटले, भाजपाचे कर्नाटक बंद

बंगळुरू  – म्हैसूरचे शासक टीपू सुलतान यांच्या जयंतीवरून कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटण्यास सुरूवात झाली आहे. भाजप सरकारच्या विरोधानंतरही कर्नाटक सरकार आज टीपू सुलतान जयंती साजरी करत आहे. त्यामुळं विरोधात भाजपा राज्यात ठिक-ठिकाणी विरोधात आंदोलन करत आहे.

टीपू सुलतान जयंती साजरी करण्याच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी उप आयुक्तच्या कार्यालयात सुध्दा आंदोलन केले. मेडीकरी येथे आंदोलन करत असलेल्या जमावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तब्येतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी स्वतला या कार्यक्रमापासून दूर ठेवल आहे. कुमारस्वामी यांचा पक्ष जेडीएसने सुध्दा या जयंती कार्यक्रमापासून दूर ठेवलं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टीपू जयंतीवर भाजपाचा विरोध पाहता संपूर्ण राज्यात सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. टीपू सुलतान जयंती शांततेत पार पाडण्यासाठी बंगुळरू, म्हैसूर, कोडागू आणि मंगळरू मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. याशिवाय कोडागू, हुबळी आणि धारवाड येथे 10 नोव्हेंबर सकाळी 6 ते 11 नोव्हेंबर सकाळी 7 वाजेपर्यंत कलम 144 लावण्यात आला आहे.

भाजपाचा विरोध….

कुमारस्वामी यांच्या अनुपस्थितीवर भाजपाने प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत लिहिले आहे की, मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी बेपत्ता आहेत. तरी काँग्रेस-जेडीएस सरकार टीपू सुलतान यांची जयंती साजरी करत आहे. मुख्यमंत्री स्वत कुठेतरी लपले आहेत. अशात टीपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात काय अर्थ आहे. हे सर्व नागरिकांची निवडणुकीत मतं मिळविणयासाठी चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)