“कबीर सिंह’मध्ये झळकणार टिना सिंह

बॉलीवूडमधील चॉकलेट हिरो अभिनेता शाहिद कपूर याचा आगामी “कबीर सिंह’ विविध कारणांमुळे सतत प्रसिद्धी मिळवित आहे. हा चित्रपट “अर्जुन रेड्‌डी’ या तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात शाहिदसह कियारा आडवाणी मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय नवोदित अभिनेत्री टीना सिंहही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

“कबीर सिंह’चे शुटिंग सुरू झाले असून टीना आणि शाहिद यांच्यातील काही दृश्‍य चित्रित करण्यात आली आहेत. शाहिद सोबत केलेल्या कामाचा अनुभव सांगताना टीना म्हणाली, शाहिद खूपच रोमांटिक असून त्याच्या सोबत काम करताना खूप चांगला अनुभव आला. चित्रिकरणावेळी त्याने अनेकवेळा मला मदतही केली. चित्रपटाचे निर्माता संदिप यांनी मला ऑरिजनल चित्रपटा दाखविला होता. तसेच त्यांनी मला चित्रपटात काम करताना पूर्ण स्वातंत्र दिले होते, असे टिना म्हणाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“कबीर सिंह’चे शुटिंग मुंबई, दिल्ली आणि मसुरल येथे होणार आहे. यात शाहिद वेगवेगळया चार लुकमध्ये दिसणार आहे. यासाठी काही महिन्यांपासूनच शाहिदने तयारी सुरू केली होती. दरम्यान, टिना सिंहने “ब्रोकन बट ब्यूटिफुल’ या वेब सीरीजमध्ये काम केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)