“वेळ’…

वेळ ही अशी आहे कि जी कोणावरही येऊ शकते. वाईट असो वा चांगली “ही’ प्रत्येकावर येते. राजाचा रंक होतो आणि रंकेचा राजा होतो हे देखील वेळ ठरवते. वेळ ठरवते की जवळचा व्यक्ती कोण आणि परका कोण. वेळेपासून कोणीच लांब पळू शकत नाही. वाईट वेळ ही कोणावर जास्त काळ टिकून राहत नाही. वेळ ही नेहमी बदलत असते. जसा वेळ जाईल तशी व्यक्तीवरील वाईट वेळ टळून जाते असते. परीक्षेच्या काळातील वेळ चांगली गेली, तर त्या व्यक्तीचे आयुष्यदेखील ही वेळ बदलू शकते.

किंमत तर मौनाची मोठी असते, शब्दांचं काय आहे वेळ बघून बदलून जातात. माणूस चांगला की वाईट ही वेळ ठरवते. भूतकाळ हा आपल्याला आठवणींचा आनंद देतो हे देखील वेळ ठरवते. पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळ देतो हे देखील वेळ ठरवते. जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे “सल्ला’. एकाकडे मागा हजार जण सल्ला देतील, मात्र जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे… मदत. हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच करेल हे देखील वेळ आल्यावर कळते…जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची….वेळेची किंमत त्याला माहित ज्याचा जीव काही सेकंदामध्ये अपघातातून वाचलेला असतो. जेव्हा आपला मृत्यू टळतो तेव्हा त्याला वेळेचे महत्त्व कळते. आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच नसती तर आपल्याला परके आणि परक्‍यात लपलेले आपले कधीच कळलेच नसते म्हणून माणूस चांगला की वाईट ही वेळ ठरवते.

-Ads-

चांगली व्यक्ती आणि चांगले विचार यांची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते. माणसाची वेळ बदलली का परिस्थिती ही बदलते. वेळ कोणासाठीही थांबत नाही कोणतेही काम वेळेतच झाले पाहिजे काही व्यक्ती कोणत्याही कामासाठी वेळ मिळतच नाही असे बोलतात. पण वेळ काढावा लागतो. वेळेसाठी आपण नाहीतर वेळ आपल्यासाठी हे समजणे आवश्‍यक आहे. असं बोलतात की जगात तुमचं एकदम जवळच कोणी असेल तर ती फक्त वेळ आहे. कारण जर आपली वेळ चांगली असेल तर सारं जग आपलं असतं आणि तीच वेळ जर आपल्यावर वाईट असेल तर कोणीच आपलं नसतं…

जर घडयाळ सोन्याचे असेल परंतु ते वेळ सांगू शकत नाही तर त्याची किंमत शून्य आहे. कारण सोन्याला नाहीतर वेळेला महत्व आहे. जशी उन्हात गेल्यावर सावलीची किंमत कळते आणि हिवाळ्यात उन्हाची किंमत कळते हे देखील वेळ आल्यावर कळते. वेळ आपल्या हातात नसते परंतु वेळेत घेतलेले निर्णय आपल्या हातात असतात. कारण वेळेत चांगले निर्णय घेतल्याने आपली परिस्थिती बदलू शकतात. व्यक्तीचे चांगले मन आणि चांगले विचार, स्वभाव या दोन्ही गोष्टी वेळ ठरवते. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही. तेव्हा रस्ता बदला, सिध्दांत नाही कारण झाड नेहमी पानं बदलतात मुळ्या नाही. “भगवत गीते” मध्ये स्पष्ट लिहिलंय निराश होऊ नको “कमजोर’ तुझी वेळ आहे तू नाहीस.

– सविता रामदास सांगळे (बेल्हे, ता.जुन्नर)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)