तुकोबांच्या पालखीची जय्यत तयारी

प्रशासनाकडून आढावा बैठक : काम पूर्ण करण्याचे आदेश

देहूगाव -जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी 334 व्या पालखी सोहळ्यासाठी झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी देहूगाव ग्रामपंचायत कार्यालयात अपर तहसीलदार गीता गायकवाड यांनी प्रशासनाच्या विविध विभागातील कामांच्या तयारीची माहिती घेतली. उर्वरित कामांचाही आढावा घेत संबधितांना सोहळा प्रस्थानापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मुख्यत्त्वे ड्रेनजच्या कामांमुळे रस्त्याचे रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सक्‍त सूचना दिल्या आहेत. पालखी सोहळा सोमवारी (दि. 24) प्रस्थान ठेवणार असून मंगळवारी (दि. 25) देहूतील पहिला मुक्‍काम घेत पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. सोहळ्यातील भाविक, वारकऱ्याच्या सोयी-सुविधा व सुरक्षिततेच्या पार्श्‍वभूमीवर अपर तहसीलदार गायकवाड यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक पार पडली. “पीएमपी’च्या 34 बसेस पुणे स्टेशन, मनपा भवन, स्वारगेट, आळंदी, निगडी या ठिकाणी सोडण्यात आहेत. त्याची थांबे तळवडे शीव चौकात जकात नाक्‍याच्या जवळ असणार आहेत. याच ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसही राहतील. 30 एसटी बसेस उपलब्ध असणार आहे. पाण्याचा टॅक्‍टरही असणार आहे. सर्व विभागांनी आपआपली उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)