अनाथांच्या आरक्षणाची होणार काटेकोर अंमलबजावणी

मुंबई: शिक्षण व नोकरीत अनाथांसाठी राज्यात 1 टक्‍का आरक्षण याआधीच लागू करण्यात आले आहे. या आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे. यामध्ये सरकारी पदे भरण्यासाठीची जाहिरात देताना अनाथांसाठी 1 टक्‍का आरक्षण नमूद करण्याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

अनाथांसाठीचे हे आरक्षण गट “अ’ ते “ड’च्या पदांसाठी सरळसेवा भरतीसाठी लागू करण्यात आले आहे. केवळ खुल्या प्रवर्गातच पदांची गणना करून त्यानुसार पदभरती करण्यात यावी अशा सूचना देणारे परिपत्रक राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.

अनाथ, निराधार बालकांना बालगृहात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आदी सर्व सोयी सरकारतर्फे पुरविण्यात येत असतात. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात. पण वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना या संस्थांतून बाहेर पडावे लागते. मग जगाच्या पाठीवरील अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. अनाथ मुलांची जातच माहिती नसल्याने त्यांना कोणत्या एका विशिष्ट प्रवर्गात समाविष्ट करता येत नाही. जातीचा दाखला नसल्याने त्यांना शासनाच्या विविध लाभांपासून वंचित रहावे लागते. या अनाथ मुलांना राज्य सरकारच्या विविध सवलतींचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडून 1 टक्‍का आरक्षण देण्याचा विचार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)