टायगर श्रॉफला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उमंग कुमारबरोबर काम करण्याची इच्छा आहे. एका चॅरिटीशोमध्ये टायगरने उमंग कुमारसमोर आपली इच्छा व्यक्त केली आहे. उमंग कुमार हे स्टार स्क्रीन पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत. त्यांना भेटण्याची संधीही आपल्याला फार कमी वेळा मिळाली आहे. उमंग कुमार यांना आपण स्टार स्क्रीन ऍवॉर्डच्या समारंभातच पहिल्यांदा भेटलो होतो, असे टायगरने सांगितले.
उमंग कुमार यांच्या कार्यालयात जाऊन काही कथांवर सविस्तर चर्चा करण्याची संधीही आपल्याला मिळाली. त्यापैकी एखाद्या कथेवरच्या सिनेमामध्ये उमंग कुमार आपल्याला घेतील, अशी आशा वाटते आहे. त्यांच्याबरोबर काम करायला ज्या दिवशी मिळेल, त्या दिवसाची आपण वाट बघत असल्याचेही टायगरने सांगितले.
टायगर सध्या पुनीत मल्होत्राच्या “स्टुडंट ऑफ द इयर-2’मध्ये काम करतो आहे. त्यामध्ये त्याच्या बरोबर तारा सुतारिया आणि अनन्या पांडे लीड रोलमध्ये असणार आहेत. “बागी-2′ नंतर टायगर बराच काळ त्याच्या त्या ऍक्शन रोलच्या धुंदीत रहिला होता. त्याला सर्वसामान्य ऍक्टरसाठीचे रोल मिळण्यासाठी बराच काळ वाट पहायला लागली होती. “स्टुडंट ऑफ द इयर-2′ मधील रोल त्याच्यासाठी त्यादृष्टीने महत्वाचा असणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा