टायगर आणि दिशा पटणीमध्ये ब्रेक अप 

टायगर श्रॉफ आणि दिशा पटणीमध्ये खूप दिवसांपासून डेटिंग सुरु आहे. जवळपास तीन वर्षे ते डेट करत असल्याचे मिडीयाचे निरीक्षण आहे. या दोघांना अनेकवेळेस एकत्र बघितले गेले आहे. या दोघांकडे बॉलिवूडची परफेक्‍ट पेअर म्हणून बघितले जात होते. त्यांच्यात किरकोळ खटके उडत होते. त्यांच्यातले मतभेद आता वाढत चालले आहेत. हे मतभेद इतक्‍या टोकाला गेले आहेत की आता दोघांचा अधिकृतपणे ब्रेक अप झाल्याची चर्चा आहे. दोघांमध्ये वारंवार पॅच अप झाला आहे. दोघांनी आपल्या नात्याला अनेक वेळा नव्याने सुरुवात करून दिली आहे. मात्र आता त्यांच्यात पॅच अप होण्याची शक्‍यता नाही. आता दोघांनी आपापल्या कामावर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले आहे.
दोघांकडेही एक से बढकर एक प्रोजेक्‍ट आहेत. “बागी 2’मध्ये सर्व लाईम लाईट टायगर श्रॉफ घेऊन गेला. दिशाला मात्र साईड रोलवरच समाधान मानावे लागले होते. तेंव्हापासून एकमेकांशी स्पर्धा असल्याप्रमाणे ते वागत होते. आता त्यांच्यातल्या या स्पर्धेचा शेवट झाल्याचे समजते आहे. दोघांनी आपल्या रिलेशनशीपबाबत कधीही खुलेपणाने काहीही सांगितले नव्हते. आता ब्रेक अप बाबतही त्यांनी काहीही सांगितलेले नाही. ब्रेक अप झाला हे निरीक्षणच आहे.
What is your reaction?
4 :thumbsup:
2 :heart:
11 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
103 :cry:
28 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)