परदेशी पर्यटक, पत्रकार आणि राजकारण्यांसाठी तिबेटचे दरवाजे बंद -चीन

बीजिंग (चीन) – परदेशी पर्यटक, पत्रकार आणि राजकारण्यांसाठी चीनने तिबेटचे दरवाजे बंद बंद केले आहेत. एक एप्रिलपर्यत ही बंदी लागू राहणार आहे. परदेशी पर्यटकांना या क्षेत्रात आणू नये, असे चीन सरकरने तेथील ट्रॅव्हल कंपन्यांना आदेश दिलेले आहेत.

1959 साली तिबेटमध्ये चिनी शासनाविरुद्ध विद्रोह झाला होता, त्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. 10 मार्चला हा वर्धापन दिन आहे. 14 मार्च 2008 मध्ये तिबेटची राजधानी ल्हासा येथे सरकारविरोधी दंगली सुरू झाल्या होत्या. या दिवसांत दंगे सुरू होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन ही खबरदारी करण्यात आले. मात्र ही बंदी कधीपासून लागू करण्यात आलेली आहे, त्या बाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)