थायराॅईडवर नियंत्रण कस कराल (भाग 2)

-डाॅ.एस.एल.शहाणे 

थायराॅईडवर नियंत्रण कस कराल (भाग 1)

अचानक वाढणारं वजन, जाणवणारा थकवा, गळणारे केस यांसारखे त्रास सुरू झाल्यावर डॉक्‍टर थायरॉइडची टेस्ट करायला सांगतात. तोपर्यंत थायरॉइड या आजाराविषयी फारसं माहीत नसतं. योग्य आहार तसंच पथ्याच्या आधाराने थायरॉइडचा आजार नियंत्रणात येतो. जनसामान्यांना थायरॉइड या आजाराची माहिती करून देणं, आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी हा लेख.

प्रत्येक वेळी एक नवं फॅड आपल्या देशात येतं. आपणसुद्धा त्यामागे डोळे बंद करून धावत सुटतो. अशीच काहीशी स्थिती गेल्या 10 ते 15 वर्षांत आयोडिनयुक्त मिठामुळे झाली आहे. ज्यांना खरोखरच गरज आहे, त्यांनी डॉक्‍टरी सल्ल्याने आयोडाइज्ड मीठ खावं किंवा जेवणातील इतर पदार्थातून आयोडिनचं प्रमाण थोडं वाढवून घ्यावं. उगीच सरसकट नॉर्मल लोकांनीही ते खात राहणं त्यांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. या मुद्दयांवर मतमतांतरं भरपूर आहेत.

थायरॉइड प्रोफाइल म्हणजे T3, T4, TSH ही टेस्ट केल्यास त्या रिपोर्टच्या खाली एक ओळ लिहिलेली असते. ती म्हणजे excess intek of iodinemay lead to high TSH drugh that increases TSH values : iodine म्हणजे बहुतांश लॅबसुद्धा हे मान्य करतात की, आयोडिनचा वापर मर्यादित असायला हवा.

रोजच्या आहारात आयोडिनची गरज 70 ते 150 mcg/day एवढी असते. फक्त 1 ग्रॅम आयोडाइज्ड मिठात आयोडिनचं प्रमाण 77 mcg एवढं असतं. आता विचार करा, आपण दिवसभरात किती मीठ खातो? गरज नसताना आपल्या शरीरात किती आयोडिन जातं? मग का नाही थायरॉइडचा आजार जडणार.

शाकाहारी लोकांच्या आहारातील आयोडिनची गरज दूध तसंच सालांसहित उकडलेला बटाटा, मुळा, गाजर, लसूण, कांदे, वांगी यांसारख्या भाज्यांमधून पूर्ण होऊ शकते. तर मांसाहारी लोक सी-फूड, अंडी या पदार्थामधून शरीरात निर्माण झालेली आयोडिनची कमतरता भरून काढू शकतात. आयोडिनची कमतरता असल्याची लक्षणं दिसू लागतात तेव्हाच आयोडिन मिठातूनही घ्यावं. मग शरीरात आयोडिनची कमतरता नसताना विनाकारण सरसकट आयोडाइज्ड मीठ खाऊ नये.

गरज नसताना आयोडाइज्ड मीठ खाण्यापेक्षा सगळ्यात उत्तम पर्याय असलेल्या संधव मीठ या मिठाच्या प्रकाराचा जेवणात वापर करावा. संधव (उपवासाचे मीठ) rock salt हे इतर दिवशीही वापरलं तर त्याने नुकसान तर काहीच नाही, उलट ब्लडप्रेशरसारखे (रक्तदाब) इतर आजारही नियंत्रित राहतील. शिवाय या मिठात शरीरासाठी उपकारक असणा-या इतर अन्य खनिजांचंही प्रमाण भरपूर असतं. अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असणारं सैंधव मीठ हे सर्वानीच रोजच्या जेवणात वापरायला काहीच हरकत नाही. कारण लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच मानवणारं असं हे मीठ आयुर्वेदालाही मान्य आहे.

शरीरातील आयोडिनचं प्रमाण हे क्‍लोरीन आणि ब्रोमीनयुक्त पाण्याने कमी होतं. पाणी शुद्ध करण्यासाठी काही ठिकाणी थेट क्‍लोरीनचा वापर केला जातो. काही ठिकाणी ब्लिचिंग पावडर तर काही ठिकाणी पॉली अल्युमिनाइज्ड क्‍लोराइडचा वापर केला जातो. पाणी शुद्धीकरणासाठी काहीही वापरा, नळाच्या पाण्यावाटे क्‍लोरीन तुमच्या पोटात प्रवेश करणारच.

क्‍लोरीनचा हा प्रवेश नाकारण्यासाठी एक साधा उपाय आहे. नळावाटे शुद्ध करून आलेलं पाणी भरून ठेवून दोन दिवसांनंतर शिळं झालं की वापरावं. तोपर्यंत त्यातील अतिरिक्त क्‍लोरीन उडून जाईल. आपण शरीराला उपकारक शिळं पाणी फेकून देतो आणि नळावाटे आलेलं क्‍लोरीनयुक्त पाणी वापरायला घेतो. मग शरीरातलं आयोडिन कमी होणारच.

व्यायामाद्वारे हायपोथायरॉइड या आजारावर नियंत्रण मिळवणं अवघड असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या वजनाच्या चिंतेने रुग्ण ग्रस्त असतो. आहार नियंत्रित करूनही, डाएटिंग करूनही वजन कमी होत नाही, अशी रुग्णांची ओरड असते.
आयुर्वेदातील पंचकर्म या शरीरशुद्धीच्या प्रक्रियेंतर्गत वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य, शिरोधारा करून घेतल्यास हायपो थायरॉइड या आजारावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येतं, असं आढळून आलं आहे.

आयोडिनचं अपुरं सेवन आणि त्यामुळे उद्‌भवणारे आजार लवकर बरे होत नाहीत. त्यासाठी आयोडिनचं अन्नातील प्रमाण योग्य राहील, यासाठी आपण जागरूक राहायला हवं. आयोडिन शरीरात साठवलं जात नाही. त्यासाठी आयोडिन रोजच पण मर्यादित प्रमाणात शरीरात गेलं पाहिजे.

विषेश महत्त्वाचं म्हणजे थायरॉइड हा आजार 100 टक्के बरा होत नाही, तर तो 100 टक्के नियंत्रणात ठेवता येतो. रुग्णाची थायरॉइडची गाठ तयार करत नसणारे रसायन योग्य मात्रेत बाहेरून देऊनच थायरॉइड नियंत्रणात ठेवता येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)