‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित 

विजय कृष्ण आचार्य यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या सिनेमाचे नवीन पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले आहे. या सिनेमातील अभिनेता आमिर  खान याने सोशल माध्यमांवर हे पोस्टर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

पोस्टरमध्ये सिनेमातील सर्व कलाकार दिसत आहेत. सिनेमात खुदाबक्स अशी भूमिका निभावणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर त्यांना कसलीतरी चिंता असल्याचे दिसत आहे. तर आमिर खान याचा अंदाज शातिर (चालबाज) दिसत आहे.

आमिर खान याचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा सिनेमा या वर्षातील सर्वात मोठा सिनेमा अाहे. सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसापूर्वी सिनेमाचं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)