‘लष्कर-ए-तोयबा’ दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन युवकांना अटक

बारामूला : उत्तर काश्मीर मधील सोपोरमध्ये सुरक्षादलाने नाकाबंदी दरम्यान दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ साठी काम करणाऱ्या तीन युवकांना अटक केली आहे.

सोपारामधील रफियाबादमधील चटलोरामध्ये दहशतवादी हालचालीच्या माहिती गुप्तचराकडून मिळाल्यानंतर सुरक्षादल आणि राज्य पोलीसांनी सांयकाळच्या दरम्यान नाकाबंदी केली होती. नाकाबंदी दरम्यान मोटारसायकलवरील तीन लोकांना सुरक्षादलानी थांबण्यासाठी सांगितले, मात्र तिघांनाही तेथून पळ काढला. त्यानंतर पाठलाग करत सुरक्षादलाने तीन युवकांना अटक केली. त्यानंतर तिघांनाही दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ साठी काम करत असल्याचे स्पष्ट केले.

अख्तर रसूल लोन, तारीक अहमद तांतरी, इरफान अहमद अशरफ ही अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. तीघेही युवक रफियाबाद येथील रहिवासी अाहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)