चिंचवडच्या मोरे चाळीतील घटना : अज्ञाताविरोधात गुन्हा
पिंपरी – चाळीमध्ये खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीच्या अंगावर, पाठीवर आणि हातावर चटके देवून जखमी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवार दि. 30 जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील विद्यानगरमधल्या मोरे चाळीत घडली.
याप्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षीय चिमुकली ही आपल्या चाळीमध्ये घरासमोर खेळत होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास अज्ञात इसमाने चिमुकलीच्या पाठीवर, मांडीवर आणि हातावर चटके देऊन दुखापत केली. हा संतापजनक प्रकार लक्षात आल्यानंतर चिमुकलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.