मुंबई – डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी रॅगिंग करणाऱ्या तिनही महिला डॉक्टरला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. भक्ती मेहरे यांना मंगळवारीच अटक करण्यात आली होती. डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल फरार डॉक्टर्सचा शोध पोलिसांकडून सुरू होता. दरम्यान पोलिसांनी डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनादेखील अटक केली आहे. या तिघींनी सातत्याने केलेली जातीवाचक शेरेबाजीच डॉ. तडवी हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे.
#UPDATE Medical student Payal Tadvi suicide case: Third accused doctor Ankita Khandelwal has also been arrested by Police. Details awaited. https://t.co/ql7qxkanWu
— ANI (@ANI) May 29, 2019
नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी नायर हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई करण्यासोबतच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगाने मागितला आहे.