काश्‍मीरातील दोन चकमकीत तीन दहशतवादी ठार 

श्रीनगर: जम्मु काश्‍मीरच्या पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यांमध्ये दोन वेगवगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये तीन दहशतवादी ठार झाले तर एक सुरक्षा जवानही शहीद झाला. कुलगामच्या रेडवानी भागात काल मध्यरात्री ही चकमक झाली. त्यात दोन दहशतवादी ठार झाले तर एक सुरक्षा जवान शहीद झाला. अन्य दोन जवानही जखमी झाले आहेत. पुलवामा जिल्ह्याच्या त्राल भागातही दुसरी चकमक झाली त्यात एक दहशतवादी ठार झाला.

ठार झालेल्या तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दहशतवाद्यांविषयी सुरक्षा दलांना गुप्तचर सूत्रांकडून माहिती मिळाली होती त्यामुळे नाकेबंदी करून त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली. पुलवामा जिल्ह्यातील दहशतवाद्यांच्या विरोधात गेल्या आठवडाभरात सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)