श्रीनगरजवळ चकमकीनंतर तीन दहशतवाद्यांना अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरमध्ये सोमवारी श्रीनगरजवळ सुरक्षा जवानांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी श्रीनगर-बारामुल्ला रस्त्यावर तपासणी नाका उभा केला. त्या नाक्‍यावर संशयावरून एका कारला थांबण्याचा सिग्नल देण्यात आला. मात्र, त्या कारने वेगाने निघून जाण्याचा प्रयत्न केला.

कारमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये एक दहशतवादी जखमी झाला. काही काळ चकमक झाल्यानंतर कारमधील तिन्ही दहशतवाद्यांना पकडण्यात सुरक्षा जवानांना यश आले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख तातडीने पटू शकली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)