जैशच्या तीन दहशतवाद्यांना काश्‍मीरमध्ये अटक

श्रीनगर – पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना गुरूवारी दक्षिण काश्‍मीरमध्ये अटक करण्यात आली. अनंतनागमध्ये 12 जूनला झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी त्यांचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले.

अटक करण्यात आलेल्या जैशच्या दहशतवाद्यांची नावे तातडीने समजू शकली नाहीत. मात्र, अनंतनाग हल्ल्याशी संबंधित तपशील त्यांनी चौकशीदरम्यान दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 5 जवान आणि एक पोलीस अधिकारी मिळून 6 जण शहीद झाले. त्या हल्ल्याची जबाबदारी एका पाकिस्तानी दहशतवाद्यावर सोपवण्यात आली होती. त्याला जैशचा स्थानिक म्होरक्‍या फयाज पुंझू अटक करण्यात आलेल्या एका दहशतवाद्याच्या घरी घेऊन गेला. तो पाकिस्तानी दहशतवादी 8 जूनपासून अनंतनागमध्ये होता. हल्ला घडवण्यापूर्वी त्याने काही भागांची टेहळणी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, तीन दहशतवाद्यांच्या अटकेची घडामोड जैशसाठी मोठा हादरा मानली जात आहे. त्या संघटनेने फेब्रुवारीत जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामात भयंकर दहशतवादी हल्ला घडवला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)