जम्मू-काश्‍मीर निवडणुकांतून दहशतवाद्‌यांच्या धमकीमुळे तीन शीख उमेदवारांची माघार

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर): जम्मू-काश्‍मीर पंचायत निवडणुकांतून तीन शीख उमेदवारांनी माघार घेतली आहे. दहशतवाद्यांच्या धमकीमुळे त्यांनी आपले उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे. पंचायत समिती निवडणुकांसाठी 29 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आपल्या धमक्‍यांचा मतदात्यांवर फारसा परिणाम होत नाही, असे दिसून आल्यानंतर दहशतवाद्यांनी आता उमेदवारांनाच धमकवायला सुरुवात केली आहे. पुलवामाच्या परीबल येथील उमेदवार सुरेंद्रसिंह यांच्या घरावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी ग्रेनेड हल्ला केला होता.

या ग्रेनेड हल्ल्यानंतर तीन शीख उमेदवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमोलक सिंह, शोभा सिंह आणि हुकुमत सिंह यांनी सोशल मीडियावर निवेदन जारी करून निवडणूक लढवत नसल्याचे जाहीर केले आहे. आपला कोणत्याही पक्षाशी संबंध नसल्याचेही एकाने म्हटले आहे. दहशतवाद्यांच्या भीतीने उमेदवारांनी निवडणुकांपासून दूर राहण्याचा प्रकार नवीन नाही. पाच वर्षांपूर्वीही निवडून आलेल्या अनेक पंचांनी-सरपंचांनी दहशतवाद्यांच्या धमक्‍यांमुळे राजीनामे दिले होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)