राबडी देवींची ‘ती’ संपत्ती आयकर विभागाकडून जप्त

पाटणा : आयकर विभागाकडून आज करण्यात आलेल्या कारवाईमध्ये बिहारच्या माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी आणि त्यांची मुलगी हेमा यांच्या एकूण तीन संपत्ती जप्त करण्यात आल्या आहेत. आयकर विभागाला या संपत्ती बेनामी आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्ली न्यायालयाने राबडी देवी, लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना तीन दिवसांपूर्वीच इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) हॉटेल घोटाळ्यामध्ये जामीन मंजूर केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयकर विभागातील सूत्रांनुसार, जप्त करण्यात आलेल्या या पाटणा शहराच्या बाहेरील भागातील तीन भूखंड यादव कुटुंबियांना त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या मजुरांनी भेट म्हणून दिल्या होत्या. या मजुरांची चौकशी केली असता आयकर विभागाने त्यांना ‘तुम्ही हे भूखंड भेट देण्याआधी ते खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आले?’ असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर त्यांना देता आले नाही. यामुळे आयकर विभागाने ही संपत्ती बेनामी ठरवत जप्तीचे पाऊल उचलले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)