नॉयडातील खंडणी प्रकरणात तीन पत्रकारांसह एका पोलिसाला अटक

नॉयडा : लाचखोरी आणि खंडणी प्रकरणात पोलिसांनी नॉयडातील तीन पत्रकार आणि एका पोलिस कर्मचाऱ्याला एका ऑपरेशन मध्ये अटक केली आहे. सुशिल पंडित, उदीत गोयल आणि रमण ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या तीन पत्रकारांची नावे असून मनोजकुमार पंत असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.

या सर्वांना आठ लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांनी एका कॉल सेंटरच्या मालकाकडून त्याच्या विरूद्धचा गुन्हा मागे घेण्यासाठी ही लाच मागितली होती असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एका पत्रकाराची मर्सिडीस बेंज कारही जप्त करण्यात आली आहे. दुसऱ्या एका पत्रकाराकडे पिस्तुल सापडले आहे तेही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात सेक्‍टर 20 च्या पोलिस ठाण्याचे एसएचओ जयवीरसिंग यांना निलंबीत करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)