तीन अमरनाथ यात्रेकरू मृत्युमुखी 

आज अमरनाथयात्रेदरम्यान  दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तीन यात्रेकरूंचा मृत्यू झाला. यापैकी दोघांचे हृदयविकाराच्या झटक्याने तर एका महिला यात्रेकरूचे अपघाती निधन झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मोहिंदर पाल नामक यात्रेकरू काली माता मार्गावर बेशुद्ध पडले व त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला तसेच जी. कोटेश्वरा नामक एका ७० वर्षीय वृद्ध यात्रेकरूला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा अमरनाथ गुहेमध्येच मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.
सविता नामक एका महिलेचा देखील मृत्यू झाला असून अमरनाथ यात्रेसाठी निघालेल्या एका खाजगी वाहनाची बस सोबत धडक झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे. यावर्षी अमरनाथ यात्रे दरम्यान मृत्यू झालेल्या भाविकांची संख्या आता २० वर पोहचली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)