बुलंदशहरातील हिंसाचारप्रकरणी तीन जणांना अटक

लखनौ: उत्तरप्रदेशातल्या बुलंदशहर इथं गोमांस सापडल्याच्या अफवेवरून हिंसाचार उफाळला. यात पोलीस अधिकाऱ्याचा हत्येचा कट रचल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्येच्या कटात विहिंप, बजरंग दल आणि भाजयुमोच्या सदस्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या परिसरात सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सुबोध सिंह यांच्या हत्येच्या कटात योगेश राज (जिल्हा अध्यक्ष, प्रवीण तोगडिया ग्रुप), उपेंद्र राघव (बजरंग दल), शिखर अग्रवाल (माजी अध्यक्ष, भाजयुमो) यांची नावे समोर आली आहे. देवेंद्र, चमन आणि आशिष चौहान अशी अटक केलेल्यांची नावे आहे.

बुलंदशहरात हिंसाचार भडकवण्याचा कट रचणाऱ्यांची धरपकड सुरु झाली आहे. सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या छाप्यात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून 75 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. योगेश राज हाच या हिंसाचाराचा सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)