शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना केडगावातून अटक

नगर – केडगाव परिसरात तडीपार गुंडावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील हत्त्यार व वाहन जप्त करण्यात आले आहे. त्याना सोमावर पर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे.

आरोपी सुनील सातपुते, निलेश भालसींग, महेश साके यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक ईशु सिंधू, पोलीस उपधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांना मिळालेल्या गुप्तमाहिती नुसार केडगाव येथील लिंक रोड येथे आरोपी सुनिल सातपुते, निलेश भाकसिंग, महेश साके असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस विष्णू भागवत, रवी टकले, नितीन शिंदे, सुमित गवळी, राहुल गवळी, भारत इंगळे, शाहीद शेख यांच्या पथकाने सापळा रचवून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व वाहन जप्त करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या आठा दिवसापूर्वी दोन गटात राजकीय वादातून केडगावात पीडब्ल्यूडी वर्कशॉप रोडवरील हॉलीबॉल मैदान येथे मनोज कराळे याला मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि.1) रोजी रात्री घडली होती. या घटनेत मनोज कराळे हा गंभीर जखमी झाला होता. महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यापासून हा वाद आणखीनच चिघळला आहे. सातपुते व कराळे हे दोघे वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे त्यांच्यात नेहमीच कुरघोडी होत असल्याची चर्चा आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जखमी मनोज कराळे याची आई मीना भाऊसाहेब कराळे (वय -42, रा. शिवाजीनगर मराठी शाळेजवळ) यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल नानाभाऊ सातपुते, सुनील सातपुते, नितीन भालसिंग, प्रवीण सातपुते, आशिष शिंदे, महेश साके, अशोक सातपुते, अनिकेत शिंदे (सर्व रा. केडगाव, शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध बेकायदा जमाव जमवून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गवळी हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)