झारखंडमध्ये चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

गुमला: झारखंड राज्यातील गुमला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. ही चमकम रविवारी(दि.24) सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाई दरम्यान घडली. घटनास्थळावरुन दोन एके-47 रायफल्स आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

झारखंड पोलीस प्रवक्ता आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक एम. एल. मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुमलामधील कामडारा परिसरात काही नक्षलवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर संयुक्‍तपणे मोहिम राबवित परिसराला पोलिसांनी वेढा दिला. त्यानंतर नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र या आवाहनाला न जुमानता नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावर दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. यात तीन नक्षलवादी मारले गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घटनास्थळी पोलिसांचा पंचनामा सुरू असून मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या परिसरात आणखीही काही नक्षलवादी लपले असण्याची शक्‍यता असल्याने सुरक्षा दलाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)