छत्तीसगड मध्ये तीन नक्षलवादी ठार 

रायपुर: छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. या चकमकीच्यावेळी एका नक्षलवाद्याला जीवंत पकडण्यात आले आहे. रायपुर पासून पाचशे किमी अंतरावरील मुलेर गावात ही चकमक झाली. पोलिसांच्या रिझर्व्ह गार्डची एक तुकडी तेथील जंगल भागात पहारा देत असताना त्यांची गाठ या नक्षलवाद्यांशी पडली त्यावेळी ही चकमक झाली.
मंगळवारी रात्री ही चकमक झाल्याचे सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले. एक रायफल, गोळ्यांनी भरलेल्या चार बंदुका, एक पाईप बॉम्ब, आणि दैनंदिन वापराच्या काही वस्तु अशी सामग्री त्यांच्याकडे सापडली आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अजून पटलेली नाही. ते नेमके कोणत्या गटाचे होते हेही अजून समजलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)