जम्मू-काश्‍मीरमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खातमा

file photo

श्रीनगर:-जम्मू-काश्‍मीरमध्ये गुरूवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खातमा केला. त्या चकमकीत एक सुरक्षा जवान जखमी झाला.

पुलवामा जिल्ह्याच्या त्रालमधील उंच भागात असणाऱ्या जंगलात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेवेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकांवर गोळीबार केला. त्याला सुरक्षा जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये काही काळ चकमक झडली. त्यात तीन दहशतवादी ठार झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झुबेर अहमद बट उर्फ अबू हुरैरा, शकूर अहमद पर्रे उर्फ जाफर आणि तौसिफ अहमद थोकर उर्फ अबू तल्हा अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. झुबेर हा जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. तर उर्वरित दोघे हिज्बुल मुजाहिदीनमध्ये सक्रिय होते.

चकमकस्थळावरून सुरक्षा दलांनी दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला. चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खातमा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. मागील काही महिन्यांत सुरक्षा दलांनी धडक मोहिमा हाती घेऊन अनेक दहशतवाद्यांना ठार केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)