मालगाडीच्या धडकेत तीन सिंहांचा मृत्यू

अहमदाबाद: गीर जंगलातील दोन सिंह आणि एका सिंहिणीचा मालगाडीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना गुजरातमधील अमरेलीत घडली आहे. हे सिंह गीर जंगलाच्या पूर्व भागातले होते असे समजते आहे. हा अपघात सावरकुंडला भागात झाला आहे. सोमवारी रात्री 12.30 च्या नंतर मालगाडी रूळावरून जात होती. त्याचवेळी एकूण सहा सिंह रूळ ओलांडत होते. त्यातले तीन सिंह रूळ ओलांडून पुढे गेले. तर दोन सिंह आणि एक सिंहिण यांना मालगाडीची धडक लागली.

सिंहांचे वय दोन वर्षे होते, तर सिंहिणीचे वय दीड वर्षे होते, अशी माहिती गीर जंगल विभागाचे प्रवक्ते डी. टी. वसवदा यांनी दिली आहे. हा सगळा प्रकार दुर्दैवी असून असे प्रकार पुन्हा घडू नयेत याबाबत दक्षता घेतली जाईल, अशीही प्रतिक्रिया वसवदा यांनी दिली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)