बारावीच्या 30 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून

संग्रहित छायाचित्र

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या असहकार आंदोलनाचा फटका

पुणे – महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने असहकार आंदोलनाच्या माध्यमातून इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे राज्यात 3 दिवसांत झालेल्या विविध भाषा विषयांच्या परीक्षांच्या सुमारे 30 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून राहिल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षक महासंघाच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित पडल्या आहेत. त्यामुळे महासंघाने विविध स्वरूपात असहकार आंदोलन सुरूच ठेवले आहे. आतापर्यंतच्या इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू या भाषा विषयांचे पेपर्स झाले आहेत. या विषयांच्या मुख्य नियामक व नियामकांच्या बैठका झाल्याच नाहीत. मागण्या मान्य होईपर्यंत या बैठका होणार नाहीत आणि एकही उत्तरपत्रिका तपासण्यात येणार नाही, असा इशारा महासंघाने दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांना महासंघाने त्याबाबत कळविलेले आहे.

येत्या 26 फेब्रुवारीला शिक्षण मंत्री व वित्तमंत्री यांची संयुक्‍त बैठक होणार आहे. या बैठकीत महासंघाच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा महासंघातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कारामुळे प्रत्येक दिवशी तपासणीविना पडलेल्या उत्तरपत्रिकांच्या संख्येत वाढ होत जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 5 जून पूर्वी इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल लावणे बंधनकारक आहे. उत्तरपत्रिका तपासणीस विलंब झाल्यामुळे निकाल लांबून विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्यास शासनच जबाबदार असणार आहे, असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)